जनतेचा उत्साह जर जागृत करायचा असेल, तर त्याच्यासाठी आधुनिक काळात राष्ट्रवादाच्या घोषणेसारखी उत्तम घोषणा नाही.
समाजात बदल घडवून आणण्याचे क्रांतिकारी चळवळ हे एक ठळक साधन आहे, हे वैशिष्ट्य सर्वांना माहीत आहे. माहीत नाही ते हे की, असाच बदल धार्मिक आणि राष्ट्रवादी चळवळींमध्येसुद्धा घडून येतो. फार मोठा आणि झपाट्याने बदल घडवून आणायचा असल्यास लोकांमध्ये आवेश संचारावा लागतो. त्यांच्या उत्साहाला उधाण यावे लागते. असा उत्साह आणि आवेश संपत्तीच्या आशेने उत्पन्न होऊ शकतो किंवा लढाऊ चळवळींच्या दर्शनानेही उत्पन्न होऊ शकतो.......